कोल्हापूर : छत्रपती शिवाजी पेठ येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी ने 'हर घर तिरंगा' या उपक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत समाज प्रबोधनपर विविध बॅनर तसेच घोषवाक्ये यांचा जयघोष करत रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला महात्मा गांधी मैदान येथील पुतळ्याची व परिसराची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समृद्धी शिंदे व सोनल वडणगेकर यांनी उत्स्फूर्तपणे भाषण केले व स्वातंत्र्य चळवळीतील गोष्टींना उजाळा दिला.
या उपक्रमासाठी प्रा. वैष्णवी निवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरचा उपक्रम कॉलेजचे प्राचार्य रविंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदरच्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी.जी.बोराडे, चेअरमन डॉ. के. जी पाटील, व्हा. चेअरमन डी.जी. किल्लेदार, खजानीस वाए. एस्. चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.




