Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या न्यू वुमन्स फार्मसीमध्ये फार्मसी सप्ताहाची सुरुवात

विविध उपक्रमांचे आयोजन 





कोल्हापूर : कोल्हापूर येथील न्यू वुमन्स फार्मसी मध्ये 'फार्मसी सप्ताह' निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात राष्ट्रीय प्रश्नमंजुषाने झाली.



दिनांक 20 रोजी शालेय मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय मुलांची आरोग्य तपासणी त्याचबरोबर आरोग्य स्वच्छता, रक्तगट तपासणी याचे आयोजन केले होते. दि. 21 रोजी 'स्तनाचा कर्करोग' याविषयी डॉ. तेजस्विनी शेणवी मार्गदर्शन करणार आहेत. तर सप्टेंबर हा महिना दरवर्षी पीसीओएस (Polycystic ovary syndrome) जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. याविषयी डॉ.अंकिता गोडवे या मार्गदर्शन करणार आहेत. दि. 24 रोजी स्लोगन स्पर्धा व सामाजिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात येऊन सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.



सदरचे उपक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहेत. उपक्रम यशस्वी करण्याकरीता प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के,  प्रा. वैष्णवी निवकर, प्रा.निकिता शेटे या विशेष परिश्रम घेत आहेत.



या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी. जी बोराडे, चेअरमन डॉ. के. जी. पाटील, व्हा.चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस. चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.