Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी संभाजीराव माने कॉलेजच्या मुलांचा व मुलींच्या संघाची निवड


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील संभाजीराव माने जुनिअर कॉलेजच्या मुलांचा व मुलींच्या संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या ‘शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी’ निवड झाली आहे. या संघाचे शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस एम कदम यांनी अभिनंदन केले.



जिल्हा शालेय क्रीडा विभाग यांच्यावतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा हेबाळ-जलद्याळ या ठिकाणी पार पडल्या. 19 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेमध्ये संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये हेबाळ-जलद्याळ च्या संघावर दोन गुणांनी रोमहर्षक विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलींच्या 19 वर्षाखालील कबड्डी संघाने अंतिम सामन्यांमध्ये रावसाहेब कित्तुरकर ज्युनिअर कॉलेज यांचे विरुद्ध पाच गुणांनी असा विजय संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाला शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, क्रीडाशिक्षक प्राध्यापक जयवंत पाटील तसेच डॉ. राहुल मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.