Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वाहतूक पोलिसांना मोबाईलवर वाहनाचे फोटो घेण्यास मनाई करावी!

ठाकरे पक्ष शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज पोलीस ठाण्याला निवेदन 


ई-चलन मशीनद्वारेच फोटो घेण्याची सूचना देण्याची मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): वाहतूक पोलिसांना मोबाईलवर वाहनाचे फोटो घेण्यास मनाई करावी व इ-चलन मशीनद्वारे फोटो घेण्याची सूचना करण्यात यावी अशी मागणी ठाकरे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.




या निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या प्रत्येक शहराच्या ठिकाणी वाहतूक सुरक्षित व्हावी तसेच अल्पवयीन मुलांकडून वाहनचालविण्याचे नियम मोडून अपघात होवू नयेत. वाहनचालकांचे परवाने, विमा, गाडी नंबर प्लेट इत्यादी

तपासण्यासाठी शासनाने प्रत्येक वाहतूक पोलिसांची नेमणुक केलेली असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होत असते. त्याचबरोबर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनावर दंडाची कारवाई करण्याचे अधिकार

सुध्दा वाहतूक पोलिसांना दिले आहेत. 



मात्र आता अनेक डिझीटल माध्यमे आली आहेत. त्यामुळे अनेक कामे काही क्षणात होत आहेत. पोलिस प्रशासन नियम मोडणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी ई-चलन मशीनच्या माध्यमातून वाहनाचे छायाचित्र घेवून नियम मोडणाऱ्या वाहनांवर आपल्या मोबाइलव्दारे फोटो घेवून दंडाची कारवाई करत आहेत. पण मोबाईल फोटो शासन ग्राह्य धरणार नसल्याचेमाहिती अधिकारातून उघड झाले आहे. तर शासन नियमप्रमाणे ई-चलन मशिनचे फोटो ग्राह्य असल्याचे जाहिर केले. त्याप्रमाणे वाहतूक पोलिसांना आपल्या मोबाईल ऐवजी ई-चलन मशिनव्दारेच फोटो घेण्याची

सुचना द्यावी व वाहनधारकांना होणारा त्रास टाळण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.



निवेदनावर उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, लक्ष्मण पाच्छापुरे, श्रीशैल साखरे, संभाजी येरुडकर, राहुल औरगोळे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.