ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांचे प्रतिपादन
गडहिंग्लजला गुणवंतांचा गौरव, ओबीसी मेळावा व नूतन कार्यकारिणी नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम उत्साहात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुस्लिम समाजातील मुले शिक्षणापासून दूर आहेत. छोट्या छोट्या व्यवसायांवरच आजपर्यंत त्यांना गुजराण करावी लागत आहे. या मुलांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केले.
गडहिंग्लज येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ओबीसी मेळावा व नूतन कार्यकारिणी नियुक्ती पत्र प्रदान असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मुबारक नाईकवाडे यांनी स्वागत केले. जहांगीर हजरत यांनी प्रास्ताविक केले. अन्सारी यांच्या हस्ते समाजातील २० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कर सहाय्यकपदी निवड झालेल्या आरती कुंडले, सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संस्था पुणे शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नजीर पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सरचिटणीसपदी डॉ. रियाजभाई शमनजी, जिल्हा संघटकपदी अमजद मीरा, तालुका कार्याध्यक्ष इम्रान मुल्ला, विभागीय अध्यक्षपदी समीर राऊत, तालुकाध्यक्षपदी आशपाक किल्लेदार, शहराध्यक्ष युनूस नदाफ, उपाध्यक्ष नूर शिलेदार यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी काशिम मुल्ला, रियाज शमनजी, अरीफ तांबोळे, फारूक ठगरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मन्सूर मुल्ला, रहिमान नाईकवाडे, समीर खडकवाले, महमद चाँद, मजिद किल्लेदार, वसिम नाईकवाडे ,वसिम वाटंगी,इम्रान पटेल , मौलाना मुबीन नदाफ , जमिर मुल्ला , युनूस नंनदीकर यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. मुबारक नाईकवाडे यांनी सूत्रसंचालन केले. अमजद मिरा यांनी आभार मानले.








