Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माणूसकीच जगातील सर्वश्रेष्ठ धर्म : फादर कुस्तास लिमा

गडहिंग्लज येथील चर्चमध्ये गुणवंतांचा सत्कार




गडहिंग्लज (प्रतिनिधी): माणूसकी हिच जागातील सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे मत फादर कुस्तास लिमा यांनी मांडले. चर्चमध्ये आयोजित गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.



ते पुढे म्हणाले की, हिंदू मुलींचा सत्कार मुस्लिम बांधवांच्यावतीने चर्चमधील फादरांच्या हस्ते होणे हा एक माणूसकीचा सुवर्णयोग असून सर्वांनी असाच सलोखा व बंधूभाव टिकवून ठेवावा असे त्यांनी सांगितले.



यावेळी जागृती ज्युनिअर कॉलेज मधील विद्या धगाटे, कोमल सोलापुरे व शुभांगी हेब्बाळे या एका वर्गातील तीन वर्ग मैत्रिणी एकाच वेळी कंपनी सेक्रेटरी ही अवघड परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे करियर घडविणारी भारतातील व्यावसायिक प्रकारची ही एक अत्यंत अवघड व महत्त्वाची परीक्षा आहे. अत्यंत कष्टातून परिस्थितीवर मात करून या तिन्ही मुलींनी मिळवलेले धवल यश हे कौतुकास्पद असून त्यांचा 'मेरा भारत' या सामाजिक ग्रुपच्या वतीने चर्च येथे फादर कुस्तास लिमा यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.



स्वागत प्रा. आशपाक मकानदार यांनी केले. यावेळी मौलाना अजीम पटेल, आशरफ पेंढारी, इकबाल शायन्नावार, मकबूल नदाफ, सिकंदर यळकूद्रे, अमन मुल्ला, आरिफ तांबोळी, युनुस नदाफ, हैदर जमादार, सादिक लमतुरे, मकबुल नदाफ, मुस्ताक मुल्ला, रमजान अत्तार, युनुस नाईकवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आभार रफिक पटेल यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.