गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांपुढील तसेच मतदान केंद्रापर्यंत जाऊ न शकणाऱ्या 541 पैकी 513 मतदारांनी गृह मतदान केले. कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस हे गृह मतदान पार पडले. जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघातून नोंद झालेल्या एकूण 4637 पैकी 4430 मतदाराने गृह मतदान केले.
निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व मतदान केंद्र पर्यंत येऊ न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर हे गृह मतदान झाले. यामध्ये 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले 3882 पैकी 3700, दिव्यांग 737 मतदारांपैकी 713 आणि अत्यावश्यक सेवेतील 18 पैकी 17 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय गृह मतदारांची संख्या व एकूण मतदान असे : चंदगड 541 पैकी 513, राधानगरी 664 पैकी 633, कागल 738 पैकी 717, कोल्हापूर दक्षिण 527 पैकी 509, करवीर 428 पैकी 410, कोल्हापूर उत्तर 470 पैकी 444, शाहूवाडी 447 पैकी 422, हातकणंगले 176 पैकी 169, इचलकरंजी 229 पैकी 224, शिरोळ 417 पैकी 389 मतदारांनी गृह मतदान केले.

