Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीज ग्राहकांच्या हितासाठी लढणारा लढवय्या कार्यकर्ता हरपला!

वीज तज्ञ प्रताप होगाडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन  





इचलकरंजी : वीज तज्ञ प्रताप होगाडे ( वय ७४) यांचे आज सकाळी साडेआठ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. एक वीज तज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने एक लढवय्या कार्यकर्ता हरपल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. सध्या ते  समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष होते.



वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विजेच्या प्रश्नावर वाचा फोडली होती. वीज क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रताप होगाडे यांची ओळख होती. १९७४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या लोक संघर्ष समिती त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्य जनता दलाचे सरचिटणीस, प्रधान महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष आदी पदांची त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली होती. भ्रष्टाचार विरोधी लढा, यंत्रमाग विजेचा प्रश्न, एनरॉन प्रकल्प यावर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला होता. त्यांच्या निधनाने वीज ग्राहकांच्या हितासाठी, न्याय हक्कासाठी लढणारा एक लढवय्या कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.