दाटे परिसरातून महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पाच वर्षातून एकदा येणाऱ्यांना लांब ठेवा : राजेंद्र गड्डयानावर
चंदगड : मला चिंता इथल्या तरुणांची आहे. तरुणांच्या हाती पेन, पुस्तक, पदव्या, रोजगार हवा आहे. काही मंडळी तरुणाईला बिघडवण्याचे पाप करत आहेत. तरुणांच्या हातात चुकीच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टिका महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी केली. चंदगड तालुक्यातील दाटे येथील प्रचार दौरा प्रसंगी ते बोलत होते. या भागातील प्रचार दौऱ्यात महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डयानावर म्हणाले, पाच वर्षातून एकदा येणाऱ्यांना लांब ठेवा. २०२९ च्या निवडणुकीमध्ये पुन्हा इथे दिसले नसले पाहिजेत. लोकशाहीने दिलेला अधिकार योग्य व्यक्तीला निवडूण आणण्यासाठी करा. ही निवडणूक ५ वर्षातुन एकदा येते विचारपूर्वक निर्णय घ्या. आपला निर्णय चुकला तर तरुणाईच भविष्य धोक्यात येईल,म्हणून येत्या २० तारखेला योग्य व्यक्तीला आपलं मत द्या. घड्याळा समोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी,भरमाण्णा गावडा, नामदेव नीट्टुरकर,अनिल सुरूतकर, शिवाजी नवकुडकर, रामचंद्र साबळे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण मोटर, संतोष मोरे, ज्ञानेश्वर मोरे, चंद्रशेखर जोशी, जयवंत तोरणेकर, शिवाजी साबळे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

