गडहिंग्लजला शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या रेशनकार्डच्या कामात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रेशनकार्ड हे महत्वाचे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते. तर त्याचा उपयोग बँक खाते, संजय गांधी, श्रावणबाळ, विवाह नोंद तसेच महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणसी प्रमाणे दर महिन्याला धान्य दिले जाते. आदी बाबींसाठी रेशनकार्ड लागत असून त्यामध्ये घरातील सर्व कुटुंब प्रमुखसह इतर सदस्यांची नांवे असतात. तर काही कामासाठी रेशनकार्डवरील नावे ग्राहय धरले जाते. पूर्वी शिधापत्रिकेतील असलेली नावे ही ऑनलाईन केल्याने ई-पॉस मशिनवर दिसत आहेत, पण महत्वाचे म्हणजे लग्न झालेल्या मुलीचे नाव व मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कमी केल्यास ऑनलाईन दिसत आहेत. पण नवीन रेशनकार्ड काढल्यास एखादे नाव वाढवल्यास अशी नावे ऑनलाईनमध्ये दिसत नाहीत. अशा प्रकारे ऑनलाईन कामात चुका असल्याने त्या कामामध्ये सुधारणा करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, संभाजी येरुडकर, श्रीशैल साखरे, किशोर चौगुले, चंद्रशेखर खवणे आदींच्या सह्या आहेत.

