गडहिंग्लज येथे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे एका अल्पवयीन मुलीवर शहजादा शेख नावाच्या परप्रांतीयाने लैंगिक छळ केला आहे. ही घटना अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. या नराधमाची सखोल चौकशी करण्यात यावी व त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गडहिंग्लज येथील मुस्लिम समाजाच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर आशपाक मकानदार, हारूण सय्यद, मौलाना पटेल, रफिक पटेल, राजू जमादार, मुन्ना सय्यद, रहेमान नाईकवाडे, नवाब मालदार, सिकंदर येळकुद्रे, मकबूल नदाफ, अशरफ पेंढारी, राहील खलिफ, अल्ताफ शानेदिवाण, हैदर जमादार, नईम पटेल, मजिद किल्लेदार, अझर जमादार, मंजूर मकानदार, युनूस नाईकवाडे, शकील जमादार, साहिल मकानदार, सलमान कोचरगी, युनुस नदाफ, मुस्ताक मुल्ला आदींच्या सह्या आहेत.


