Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये परप्रांतीयाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; संतप्त जमावाकडून दुकानाची तोडफोड

पोलीस ठाण्यासमोर तब्बल तासभर नागरिकांनी मांडले ठाण 


दोघांवर गुन्हा दाखल ; दुकान मालक ताब्यात ; कामगाराचा शोध सुरु 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे पीओपीच्या कामासाठी मुळच्या उत्तर प्रदेशच्या एका ठेकेदाराकडे काम करणाऱ्या शहेजाद शेख (वय २६, रा. उत्तर प्रदेश) याने एका बारावर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकारावरून हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत त्या ठेकेदाराला जाब विचारला. छेड काढणारा युवक तेथून पलायन केल्याचे लक्षात येताच संतप्त जमावाने दुकानाची तोडफोड केली. दरम्यान, संतप्त जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारात येत संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय येथून हलणार नसल्याची भूमिका घेतली. तब्बल तासभर घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी ठाण मांडला होता. अखेर रात्री दुकान मालकासह कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा जमाव शांत झाला. 




याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बरकतअली रईस पाशा ( मूळ गाव उत्तर प्रदेश, सध्या राहणार गडहिंग्लज) याच्या दुकानात शहेजाद शेख हा युवक काम करतो. आठ दिवसापूर्वी शेख हा राहत असलेल्या त्याच्या  शेजारच्या घरातील मुलीचे अंगणात भांडी धुत असताना मोबाईलवर फोटो काढला होता. त्या मुलीने फोटो डिलीट कर असे सांगताच त्याने तिचा हात पकडून तिचा  विनयभंग केला होता. हा प्रकार त्याच्या दुकान मालकाला समजल्यानंतर मालकाने पोलिसात न जाता परस्पर प्रकरण मिटवले होते. याची माहिती मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे, मनसेचे नागेश चौगुले, राष्ट्रवादीचे संतोष चिकोडे यांना समजताच त्यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना व नागरिकांनी एकत्र येत संबंधित दुकान मालकाला जाब विचारला. मात्र बरकतअली याने तो कामगार तिथून पळून गेल्याचे सांगितले. त्यामुळे जमाव संतप्त होऊन त्याच्या दुकानाची मोडतोड केली. त्यानंतर हा जमाव पोलीस ठाण्याकडे आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत दुकान मालक व त्या कामगारावर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय येथून हटणार नसल्याचा पवित्रा घेतला. पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांनी कारवाई करतो मात्र मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्याशिवाय कारवाई करता येत नसल्याची भूमिका मांडली. तब्बल तासाभरानंतर संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी सदर दुकान मालकाला ताब्यात घेतले असून पसार झालेल्या त्या कामगाराचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांनी पोलीस ठाण्याकडे येत संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.