Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी

काँग्रेसचे उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांची अचानक माघार ; सतेज पाटील संतापले 



कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आज नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी अचानक उमेदवारी अर्ज माघार घेतला. यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी संतप्त भावना व्यक्त व्यक्त केल्या. या घडामोडींमुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.



या मतदारसंघात काँग्रेसने सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र येथे नगरसेवकांचा विरोध लक्षात घेता ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलून मधुरीमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे राजेश लाटकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. दरम्यान, आज नाट्यमय घडामोडी घडल्या. मधुरीमा राजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघात नवा ट्विस्ट  निर्माण झाला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने अपक्षाला पाठिंबा द्यावा लागणार आहे. अंतिम क्षणी मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.