गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माजी विद्यार्थी एम.एस.एन. रेड्डी कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रमेश हलगडगी, गायत्री पाटील, सुश्मिता गडदर, राजवर्धन घाटगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते.
स्वागत व प्रास्ताविक ट्रेनिंग आणि प्लेसमेंटविभाग प्रमुख प्रा. मनीषा जाधव यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी या उपक्रमाच्या आयोजनाचा मुख्य हेतू स्पष्ट केला. तसेच गुणवत्तेबरोबर अन्य कौशल्यांचा विकास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एम.एस.एन.रेड्डी कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रमेश हलगडगी यांनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग क्षेत्रासाठी कोणत्या कौशल्य गुणांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी गायत्री पाटील, सुश्मिता गडदर यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे महत्व व त्यानंतर उपलब्ध असणाऱ्या संधीबाबत मार्गदर्शन केले. राजवर्धन घाटगे यांनी ए.आय.चे औषधनिर्माण शास्त्रातील महत्व विशद केले. यावेळी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, डी. फार्मसीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनीषा जाधव यांनी केले. तर आभार प्रा. स्नेहल दळवी यांनी मानले.




