Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदाताईंना कर्नाटकातील जारकीहोळींचा पाठिंब्याच्या वृत्ताची चंदगड मतदारसंघात जोरदार चर्चा

पराभव समोर दिसत असल्याने फेक न्यूजची स्टंटबाजी ; अप्पीना मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याने नंदाताईंनी घेतला धसका - अप्पी पाटलांच्या कार्यकर्त्यांचे प्रत्युत्तर




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर यांना काल राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांचे पाहुणे कर्नाटकातील बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची चंदगड विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा झाली. दरम्यान, अप्पी पाटील यांना चंदगड विधानसभा मतदारसंघातून मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्याचा नंदाताई बाभुळकर यांनी धसका घेतल्याने असे फेक न्युज पसरविण्यात येत असल्याचे प्रत्युत्तर अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे.




काल संध्याकाळी घडलेल्या या घडामोडीनंतर आज दिवसभर या पाठिंबाची चर्चा चंदगड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. या वृत्ता संदर्भात अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले असून  अप्पी पाटील यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर यांनी धसका घेतला असून अमक्याचा पाठिंबा तमक्याच्या पाठींबा अशा फेक न्यूज पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा त्यानी प्रयत्न चालविला आहे. सतीश जारकीहोळी हे बेळगावचे पालकमंत्री आहेत. पुरोगामी विचारांचे नैतिक चारित्र्य असलेले संविधानिक मूल्यांची जपणूक करणारे ते नेते आहेत. ते अप्पी पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत. तसे ते या मतदारसंघात कधीच हस्तक्षेप करीत नाहीत. तरीही जनतेत संभ्रम  निर्माण करण्यासाठी मीडियाला मॅनेज करत त्यांच्या पाठिंब्याच्या बातम्या पसरविणे ही खेळी संघीय विचारांशी जुळणारी आहे. अशा या स्टंटबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे प्रत्युत्तर दाखल अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.