Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

औरनाळ प्रो कबड्डीत टायटन्स स्पोर्ट्स ठरला विजेता

फलटण स्पोर्ट्सला उपविजेतेपद


अनिकेत सावंत, विश्वजीत भोसले सर्वोत्कृष्ट 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे तीन दिवस चाललेल्या प्रो कबड्डी स्पर्धेत टायटन्स स्पोर्ट्सला विजेतेपद तर फलटण स्पोर्ट्सला उपविजेतेपद मिळाले. गावातील हनुमान मंदिराच्या पटांगणावर या स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणात पार पडल्या. स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. स्पर्धेसाठी शौकिनांची मोठी गर्दी होती. स्पर्धेतील तिसरा क्रमांक रॉयल चॅलेंजर्स तर चौथा क्रमांक सनरायझर्स या संघाने पटकाविला.सर्व संघाना रोख रक्कम आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.




स्पर्धेचे उदघाटन केदारी रेडेकर शिक्षण संकुलाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, डॉ. वृषभ कासार यांच्या हस्ते झाले. मेजर बाळासाहेब भोसले यांनी स्वागत केले. स्पर्धा समन्वयक संपत सावंत यांनी प्रास्ताविकेतून स्पर्धेचा हेतू कथन केला. यावेळी योगदिप अकॅडमी उत्तुरच्या राष्ट्रीय योग पटूनी योगासनाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.



स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू अनिकेत सावंत, सचिन पाटील यांना तर बेस्ट डिफेंडर विश्वजीत भोसले, कार्तिक सावंत यांचा गौरव करण्यात आला. सर्व विजेत्या संघांना रोख रक्कम, आकर्षक चषक व मेडल्स अभिजीत पाटील, तेजस सावंत, संतोष भोसले, महावीर कासार, डॉ. तेजस्विनी कासार, डॉ. दिव्या जामदार, सौ. अक्षता मोरे, सौ. सरिता अजगर, सौ. साक्षी सावंत, सौ. संपदा सावंत, अण्णासो भोसले, सतीश माने,सुभाष चौगुले, अमोल चौगुले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रकाश हरकारे, सुरज पाडले, तुषार पाटील यांनी केले.



स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय अजगर,पांडुरंग भोसले, मेजर रवींद्र चव्हाण, सचिन मोरे, विजय भोजणे, संगम  हिरेमठ, श्रेयस अजगर,अक्षय पाटील, गंधर्व सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सावंत यांनी तर आभार मेजर बाळासाहेब भोसले यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.