गडहिंग्लज (प्रतिनिधी): साधना प्रशालेच्या क्रीडा महोत्सवात दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी सांघिक खेळ व वैयक्तिक खेळ खेळले.
सांघिक खेळ हे ब्ल्यू हाऊस, गोल्ड हाऊस, ग्रीन हाऊस आणि रेड हाऊस यांच्या अंतर्गत पार पडले. सब ज्युनियर, ज्युनियर व सीनियर या गटामध्ये विद्यार्थ्यांनी सांघिक खेळ खेळले. यामध्ये कबड्डी, खो-खो, लांब उडी, गोळा फेक, थाळीफेक व धावण्याच्या शर्यती पार पडल्या. वरील सर्व स्पर्धा क्रीडाशिक्षक विनय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली लाभले.
सदर स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य आय पी. कुटिन्हो आणि पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांनी अभिनंदन केले. क्रीडा स्पर्धेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


