Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी भविष्यात पशु व्यवसायकडे रोजगाराची संधी म्हणून पहा

पशुवैद्यकीय डॉ. ए. एम.मनगुतकर यांचे प्रतिपादन 

 

महागावात ' फाली 'विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




गडहिंग्लज (प्रतिपादन): भविष्यात सर्वांनाच नोकऱ्या मिळतील अशी परिस्थिती सद्यस्थितीला राहिली नाही.त्यामुळे भविष्यात पशुसंवर्धन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध व्यवसाय केल्यास उत्तम प्रकारच्या रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. म्हणून या व्यवसायाकडे रोजगाराची संधी म्हणून पहा असे प्रतिपादन महागाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एम. मनगुतकर यांनी केले.



महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या ' फाली ' च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रास्ताविक कृषी शिक्षक प्रथमेश शेळके यांनी केले.यावेळी त्यांनी अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले.



डॉ. मनगुतकर यांनी यावेळी बोलताना पशूंना वर्षातून दोन वेळा जंतनाशक देणे, जनावरांवर वर्षातून एकदा लसीकरण करणे,जनावरांची वाढ व दुग्ध वाढीसाठी योग्य प्रमाणात चारा व सुग्रास,कृत्रिम रेतन याविषयी मार्गदर्शन करत कृत्रिम रेतन,तीन महिने, सहा महिन्यांची अर्भके विद्यार्थ्यांना दाखवली.यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ.मनगुतकर यांनी दिले. सूत्रसंचालन संदेश कोकितकर यांनी तर आभार सुभाष सुतार यांनी मानले. यावेळी शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



या उपक्रमासाठी समर्थ महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस. पाटील,संस्था प्रतिनिधी प्रा.डी. एस. पाटील, आण्णासाहेब पाटील,पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.