Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगेच्या दीप इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

कबड्डी, खो-खो, गोळाफेक, धावणे आदी स्पर्धांचा समावेश


विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : अनमोल चॅरिटेबल ट्रस्टच्या दुंडगे येथील दीप इंग्लिश मीडीयम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.



उदघाटन जनता सहकारी बँकेच्या गडहिंग्लज शाखेचे व्यवस्थापक ज्योतिबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्षा प्रा. अनिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण दावणे यांनी केले. मुख्याध्यापिका विद्या कांबळे यांनी क्रीडा महोत्सवाबाबत थोडक्यात माहिती दिली. जनता बँकेचे व्यवस्थापक श्री. पाटील यांनी खेळामध्ये हार-जीत ही येतेच. त्यामुळे हारलेल्या खेळाडू, संघांनी नाराज न  होता हार आनंदाने स्वीकारावी. तसेच खेळात एकसंघपणा दाखवावा, असे आवाहन केले.



अध्यक्षा प्रा. अऩिता पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. तीन दिवस झालेल्या क्रीडा महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक खेळ घेण्यात आले. यामध्ये धावणे,  रिले, कबड्डी, खो-खो, गोळाफेक, क्रिकेट आदी खेळांचा समावेश होता.  सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. क्रीडा शिक्षक म्हणून एस. बी. नाईक यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.