Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावात जागतिक दिव्यांग दिन साजरा

बाळासाहेब पाटील यांच्याकडून ब्लॅंकेट वाटप 



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव पंचक्रोशी दिव्यांग संघटनेच्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन येथील सैनिक भवनात मोठ्या साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन महादेव घुगरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अपंग महामंडळाचे सचिव बाळासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे ,उपसरपंच संदीप कोकितकर ,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवाजीराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी बाळासाहेब पाटील यांच्याकडून दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व दिव्यांग बांधवांनी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे ,गटविकास अधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन दिव्यांगांच्या समस्या मांडल्या व शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याची विनंती केली.



हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राजाराम कुंभार, उपाध्यक्ष सुभाष खानापुरे, सचिव आनंदा हुंदळेकर,कार्याध्यक्ष मुकुंद मनगुतकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी,दिव्यांग बांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संभाजी पोवार यांनी तर आभार ग्रा पं.सदस्य विकास इंगोले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.