मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून जोरदार घडामोडी घडल्या. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे उद्या दिनांक 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
बैठकीस भाजपचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन, विजय रुपानी, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, अशोक उईके, संजय सावकारे, मेघना बोर्डीकर, संभाजी पाटील निलंगेकर, योगेश सागर, दिलीप गोडसे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

