कराटे स्पर्धेत १४ मुला-मुलींची चमकदार कामगिरी ; पदकांची लयलूट
रायगड : रायगड जिल्ह्यातील रोहा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडहिंग्लज तालुक्यातील बुगडीकट्टी गावातील १४ मुला-मुलींनी एकापेक्षा एक पदक मिळवत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या मुलांनी गावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवले. या स्पर्धेत भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश अशा पाच देशातील खेळाडूंचा समावेश होता. कोल्हापूर जिल्ह्यातील या टीमचे नेतृत्व मास्टर प्रिती गिडमणी व प्रेम गिडमणी यांनी केले. ही स्पर्धा २४ डिसेंबर रोजी पार पडली.
या स्पर्धेत प्रदिप्ता लगमा नाईक सुवर्ण व कांस्यपदक, अर्नव गजानन कुणके- सुवर्ण व कांस्यपदक, सिद्धार्थ भरमा बारबल - सुवर्ण व कांस्यपदक, अनुराग रणविजय गिडमणी - सुवर्ण व रौप्य पदक, भार्गव लगमा नाईक- रौप्य व कांस्यपदक, आदर्श चंद्रकांत देसाई - रौप्य व कांस्यपदक, श्रावणी इराप्पा गडदाकी - रौप्य व कांस्यपदक, आर्यन शिवाजी येळ्ळूरी - रौप्य व कांस्यपदक, सोमनाथ विजय देसाई - कांस्यपदक, आदर्श सचिन बारबल- दोन कांस्यपदक, आदित्य अनिल देसाई - दोन कांस्यपदक, प्रणित भरमा बारबल- दोन कांस्यपदक तर ब्लॅक बेल्टमधील मास्टर प्रिती रणविजय गिडमणी - सुवर्ण व रौप्य पदक, प्रेम रणविजय गिडमणी- सुवर्ण व कांस्यपदक मिळविले. या यशाबद्दल बुगडीकट्टी गावात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.


