Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथे शनिवारपासून पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा

युनायटेड चषक : सोलापूर, मिरज, बेळगाव संघाचा सहभाग




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत शनिवार (ता. २८ ) पासून पंधरा वर्षाखालील आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत स्थानिक गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलसह सोलापूर, मिरज, बेळगावचे संघ सहभागी आहेत. साखळी आणि त्यानंतर बाद पध्दतीने हि स्पर्धा होणार आहे. स्पर्धा एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर होणार आहे.



कुमार खेळाडूंना सामने खेळण्याचा अधिक अनुभव मिळावा असा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक खेळाडूंना परगावच्या खेळाडूंशी लढून खेळातील कौशल्यात सुधारणा करावी यासाठी हा प्रयत्न आहे. डॉ घाळी लीग स्पर्धेतून खेळाडू निवडून त्यांचे दोन संघ तयार करण्यात आले आहेत. गेले दहा दिवस या संघाचे सराव शिबिर सुरु आहे. या दोन संघासह सोलापूरचा एसएसएसआय अकादमी, बेळगावची मँजिक स्पोर्टिंग क्लब, कुडाळ फुटबॉल अकादमी, मिरजेची स्कुल ऑफ फुटबॉल असे सहा संघ सहभागी आहेत. उपस्थित राहून शौकींनानी नवोदितांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी, यांनी केले आहे.


संघाची प्रत्येकी तीन याप्रमाणे दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. साखळी पध्दतीने पहिला ठप्पा असून प्रत्येक गटातील दोन संघ उपात्यं फेरीसाठी पात्र ठरतील. रविवारी उपांत्य फेरी, तिसरा क्रमांकाचा आणि सायंकाळी अंतिम सामना होईल. भारतीय फुटबॉल क्षेत्राला वयचोरीची किड लागली आहे. त्याविरूध्द रिलायन्स, बंगळूर एफसी, गोवा एफसी आदी आयएसएल आणि आय लीगचे संघ एकवटले आहेत. या मोहिमेत या स्पर्धेच्या निमित्ताने ‘लढा वयचोरी विरूध्द’ याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. समन्वयक सुरज हनिमनाळे आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.