छायाचित्र : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : २५ डिसेंबर मनुस्मृति दहन दिवसाचे औचित्य साधून सर्व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आर. पी. आय (ए) मुक्ती संघर्ष समिती, भारतीय बौध्द महासभा, भीमशक्ती, रिपब्लिकन सेना, भीम आर्मी, आण्णा ब्रिगेड, दलित महासंघ, राष्ट्र सेवा दल, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, सी.पी.एम. (मार्क्सवादी), सी.पी.आय. जनता दल, मी वडर महाराष्ट्राचा संघटना, लकी खिदमत फौंडेशन, लेणी संवर्धन चळवळ, भारतीय मुस्लिम विकास परिषद, अपंग संघटना, सेक्युलर मुव्हमेंट, कास्ट्राईब संघटना, विद्रोही सांस्कृतीक चळवळ, श्रमिक मुक्तीदल (लोकशाहीवादी) फुले-आंबेडकर विद्वत सभा, खाटीक समाज संघटना, वंचित बहुजन युवा आघाडी, सखी महिला मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, गडहिंग्लज, संविधान संवर्धन चळवळ, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


