'प्रथम एज्युकेशन फाउंडेशन' मार्फत गडहिंग्लज येथे 'ऑटोमोटिव्ह फोर व्हीलर मेकॅनिक'चे मिळणार मोफत प्रशिक्षण
नाव नोंदणी करण्याचे फाउंडेशनच्या वतीने आवाहन
कोल्हापूर : येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत बेरोजगार युवक- युवतीना मोफत प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडहिंग्लज येथे 'ऑटोमोटिव्ह- 4 व्हीलर मेकॅनिक' चे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती गडहिंग्लज विभागाच्या समन्वयक भुवनेश्वरी गौरीमठ यांनी दिली आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी गडहिंग्लजमध्ये 10 दिवस आणि कोल्हापुर सेंटरमध्ये 30 दिवस असणार आहे. या प्रशिक्षणासाठी 8 वी पास किंवा त्यावरील शैक्षणिक पात्रता चालणार असून 18 ते 35 पर्यंत वयोमर्यादेची अट आहे. या मोफत प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड, शाळेचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, तीन आयडेंटी साईज फोटो ही कागदपत्रे लागणार आहेत.
हे मोफत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारत सरकार प्रमाणित सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण दरम्यान ट्रेनिंग किट दिले जाणार आहे. यामध्ये युनिफॉर्म ,शूज आयडी व स्टेशनरी यांचा समावेश आहे. कोल्हापूर मधील 30 दिवस प्रशिक्षण दरम्यान मोफत निवास व भोजन सुविधा तसेच मुलींना टू-व्हीलर ड्रायव्हिंग शिकवले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जाणार आहेत. या मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी गडहिंग्लज विभागातील समन्वयक भुवनेश्वरी गौरीमठ- 7387141150 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



