गडहिंग्लज : तेरणी (गडहिंग्लज) येथील तायव्वा केदारी सावेकर (वय ९९) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा सुबराव, संभाजी, रामदास, मुलगी आवाक्का, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तायव्वा आजी या नेहमी हसतमुख असायच्या. गल्लीतील लहानांपासून थोरांची त्या मोठ्या आस्थेने विचारपूस करत. त्यांच्या निधनाने जुन्या काळातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

