Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक पदी शिवशंकर हत्तरकी यांची निवड

हत्तरकी गटाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक पदी शिवशंकर राजकुमार हत्तरकी यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे होते. 



कारखान्याचे संचालक सदानंद हत्तरकी यांचे निधन झाल्याने हे संचालक पद रिक्त होते. या जागी दिवंगत सदानंद यांचे बंधू शिवशंकर यांना संधी देण्यात यावी अशी मागणी हत्तरकी गटाच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवशंकर हत्तरकी यांना संचालक पदी संधी देण्यात आली आहे. शिवशंकर यांचे नाव रवींद्र पाटील यांनी सुचविले तर सतीश पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे,  उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, अशोक पाटील, रमेश पाटील, तमाण्णा पाटील, वरदशंकर वरदापगोळ यांच्यासह इतर उपस्थित होते. निवडीनंतर हत्तरकी गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.