Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुगळी येथे विशाळी यात्रेनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे विशाळी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध स्पर्धा संपन्न झाल्या.



दरवर्षी येथील ग्रामस्थ ही यात्रा मोठ्या भक्तीभावाने साजरी करतात. पहिल्या दिवशी सायंकाळी कुंभार गल्लीतून लक्ष्मीची ओटी भरली जाते व पालखी नदीकडे प्रायाण होते. रात्रभर भजन व महाप्रसाद करणे,  दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीची ओटी व आलेल्या सर्व महिलांची ओटी भरली जाते. या यात्रेचे विशेष म्हणजे नदीच्या पाण्यातुन एका दोरीच्या साह्याने महाप्रसाद मुगळी गावातून  हेबाळ या गावातील भक्तांना दिला जातो. यात्रेनिमित्त सुमारे दहा हजारहून अधिक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते




या यात्रेनिमित्त विविध स्पर्धा पार पडल्या. हॉलीबॉल स्पर्धेत अनुक्रमे  मांजरी स्पोर्ट्स, करंजीवणे, सेवन शूटर्स गडहिंग्लज या संघानी यश मिळविले. नवतर आदत बैलगाडी शर्यतीत शरद कुराडे, मुगळी, संजय कदम कडगाव, दौलत पाटील, दोन्ही नवतर घोडागाडी शर्यतीत सचिन कोंडे, शरद कुराडे, भैया चव्हाण, पाडा बैल शर्यतीत शिवराज कटकोळे, प्रकाश रणवरे, पांडुरंग नार्वेकर, जनरल घोडागाडी शर्यतीत शरद कुराडे, आर एक्स १००, मल्लिकार्जुन बंदी, जनरल बैलगाडी शर्यतीत महेश पाटील नूल, संजय मेजर माद्याळ, प्रकाश रणवरे कडगाव यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. हातात कासरा धरून बैल पळवणे शर्यतीत सिद्धेश्वर ग्रुप चनेकुप्पी, तर द्वितीय तृतीय बेळगुंदी व बिद्रेवाडी येथील गावाने क्रमांक मिळविले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.