Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एमआर युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेत शिवराज इंग्लीश स्कुलला विजेतेपद

सर्वोदया स्कुलला उपविजेतेपद ; स्वप्निल पाटील स्पर्धावीरचा मानकरी 


गडहिंग्लज : विजेत्या शिवराज स्कूलला करंडक देताना निशिकांत गोरुले, संभाजी शिवारे. सोबत डॉ राकेश बेळगुद्री, संभाजी शिवारे, बाळ पोटे पाटील, उत्तम देसाई, प्रविण चव्हाण, प्रशिक्षक दिपक कुपन्नावर आदी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): अंतिम चुरशीच्या फुटबॉल सामन्यात शिवराज इंग्लीश मिडीयम स्कुलने सर्वोदया स्कूलला  २-१ असे नमवून  विजेतेपदासह एमआऱ युनायटेड ट्रॉफी पटकावली. सर्वोदया स्कूलचा स्वप्नील पाटील स्पर्धावीरचा मानकरी ठरला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत  तेरा वर्षाखालील गटासाठी हि स्पर्धा झाली. स्पर्धेत बारा शाळांचा सहभाग होता. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष होते.




अंतिम सामन्यात पुर्वार्धात दोन्हीं संघानी सावध पवित्रा घेतल्याने ०-० ही गोलकोंडी फुटू शकली नाही. खासकरून शिवराजचा गोलरक्षक समर्थ शेटके याने सर्वोदयाचे दोन हमखास गोलचे फटके अडवून बचाव अभेद्य ठेवला. उत्तरार्धाच्या सातव्या मिनिटाला शिवराजच्या रणवीर कुराडेने पहिला मैदानी गोल करून खाते उघडले.  फरहान नदाफने १३ व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल करून आघाडी २-० अशी वाढवली. सामना संपण्यास सहा मिनिटे असताना सर्वोदयच्या कर्णवार देसाई उत्कृष्ट  गोल करून सामन्यात २-१ अशी रंगत आणली. पण, त्यानंतर शिवराजने बचावावर लक्ष केंद्रीत करून सर्वोदयाला रोखत विजेतेपद साकारले.



एम. आर. हायस्कूल माजी विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत गोरूले, युनायटेडचे संचालक संभाजीराव शिवारे यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांचा चषक आणि क्रीडासाहित्य देऊन गौरव झाला. यावेळी बाळ पोटे पाटील, डॉ राकेश बेळगुद्री, उत्तम देसाई, प्रविण चव्हाण, सत्यजित दरेकर,  विजय पाटील, तानाजी देवेकर, ओमकार जाधव यांच्यासह क्रीडाशिक्षक, पालक उपस्थित होते. समन्वयक रोहित साळोखे यांचा सत्कार झाला. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला.  आदर्श दळवी यांनी आभार मानले.


 उत्कृष्ट खेळाडू

स्पर्धा वीर - स्वप्नील पाटील ( सर्वोदया )

गोलरक्षक – समर्थ दिवटे ( सर्वोदया )

बचावपटू – फरहान नदाफ ( शिवराज)

मध्यरक्षक - श्रीराज सरदेसाई ( शिवाजी )

आघाडीपटू – रणवीर कुराडे ( शिवराज )





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.