कोल्हापूर : येथील श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेजऑफ फार्मसीमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यींनीसाठी स्लोगन स्पर्धा घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यीनीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्लोगन व पोस्टर च्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थीनीनी उत्स्फूर्तपणे भाषण करत आपले विचार मांडले.
यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. के.जी. पाटील, संचालिका सौ. सविता पाटील, यांनी भेट देवून विद्यार्थीनीचे व स्टाफचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.सविता म्हाळुंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार प्रा.पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, प्रा. सुप्रिया अजेटराव प्रा.निकीता शेटे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




