Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी ; शहरातून सवाद्य मिरवणूक

                                                  छायाचित्र : मजिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे संत रोहिदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.




भैरी रोड येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर श्री बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. बाजारपेठ, लक्ष्मीरोड, महामार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली.



प्रतिमेचे पूजन माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांचे हस्ते करण्यात आले. स्वागत सचिन कांबळे यांनी तर आभार प्रकाश कुराडे यांनी मानले. यावेळी जगन्नाथ कुराडे, मिलिंद कुराडे, पांडुरंग कांबळे, संदीप कुराडे, सुरेश गवळी, विठ्ठल सांगलीकर, सुभास कुराडे, स्वागत कांबळे, नामदेव कांबळे,रायाप्पा दोडमणी, राजू सौदागार, सागर कदम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.