चहा, कॉफी, नाश्ता, बेकरी पदार्थ, कोल्ड्रिंक असे सर्व काही मिळणार एकाच छताखाली
आजरा : येथे आंबोली रोडवर भाई भाई थिएटर समोर व आजरा पेट्रोल पंपाशेजारी 'हॉटेल पंचतारा' व 'भाई भाई कोल्ड्रिंक्स -बेकर्स' चे शानदार शुभारंभ झाले.
आकर्षक इंटेरिअर, सेवा, तत्परता आणि स्वादिष्ट पदार्थ हे या हॉटेलचे वैशिष्ठ्य रहाणार आहे. चहा, कॉफी, नाश्ता, बेकरी पदार्थ तसेच कोल्ड्रिंक असे सर्व काही एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांची एकप्रकारे पर्वणीच आहे असे हॉटेलचे संचालक अब्दुलराहिमान दीडबाग यांनी सांगितले.
हॉटेलचे उदघाट्न श्रीमती बेबीजान सिलेमान दीडबाग यांचे हस्ते झाले. यावेळी पाहुणे म्हणून मुफ्ती अब्दुल हमीद (सातारा )हे उपस्थित होते.
कार्यक्रमास इसाक शेख, इब्राहिम शेख, डॉ. इकबाल सैय्यद, रशीद बाबालाल पठाण, शरफू पठाण, रफिक दीडबाग, शाकीर दीडबाग, सलीम दीडबाग, आयुब दीडबाग, अजीज किल्लेदार, मजीद किल्लेदार, अशफाक किल्लेदार, समीर चांद, पत्रकार हसन तकीलदार उपस्थित होते.


