Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बसर्गेत टोणपी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार उत्साहात

विद्यार्थ्यांनी नृत्य, गीते, भावगीते, भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम केला सादर 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील बी. एम. टोणपी मराठी विद्यालयाचे संयुक्त वार्षिक कलाविष्कार स्नेहसंमेलन बसर्गे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. बसर्गे सरपंच भारती रायमाने, हलकर्णी सरपंच योगिता संगाज, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, भागोजी कागीनकर, ज्ञानदेव यादव, अप्पासाहेब टोणपी, सचिव अर्चना टोणपी, आनंद चौगुले, रामगोंडा जिनानावर यांची प्रमुख उपस्थिती होती.




डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियर मॅनेजमेंटचे डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गीतावर नृत्य सादर केले. देशभक्ती, शेतकरी गीत, भावगीते, भक्ती गीते असा बहारदार कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला  पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



कार्यक्रमास वैष्णवी काळे,अशोक लवटे ,रोहित चिकबसर्गे ,एस बी भोसले,एस.एल.कांबळे, पी. बी. भोई पी. एम. पाडवी, अतुल पाटील, एस. पी. व्हनोळी, एम. पी. शिंदे, आर. ए. पानारी, एस. एस. मुल्ला, शिक्षक ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक पी. एच. वाके यांनी केले. सचिव अर्चना टोणपी यांनी  आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.