Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेड, सॉकर ट्रेनिंगची विजयी सलामी

केएसए ग्रामीण फुटबॉल लीग सुरु


केबीआर, संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लबचा पराभव 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजपासून कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे (केएसए) सुरु झालेल्या ग्रामीण फुटबॉल लीगमध्ये गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन 'अ' , सॉकर ट्रेनिंग सेंटरने प्रतिस्पर्ध्याचा पाडाव करून विजयी सलामी दिली. त्यांनी अनुक्रमे संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लब, काळभैरी रोड फुटबॉल क्लबला (केबीआऱ) सहज हरविले. येथील शिवराज महविद्यायालयाच्या मैदानावर ग्रामीण लीग सुरु आहे. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेचे संयोजन केले आहे.




पहिल्या सामन्यात गतविजेत्या गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन 'अ' संघाने संयुक्त भिमनगर क्लबचा ४-१ असा दणदणीत पराभव केला. पुवार्धाच्या सुरवातीला भिमनगरने भक्कम बचाव करून युनायटेडला संधी दिली नाही. मध्यंतरास तीनच मिनिटे असताना युनायटेडच्या सौरभ मोहितने मारलेला जोरदार फटका भिमनगरच्या गोलरक्षकाला रोखता आला नाही. त्यावेळी उपस्थित प्रसाद पोवारने चेंडूला अचूक गोलमध्ये मारून श्रीगणेशा केला. पाठोपाठ ३६ व्या मिनिटाला युनायटेडच्या सिध्दार्थ दड्डीकरने गोलक्षेत्राबाहेरून उत्कृष्ट फटका मारून आघाडी २-० अशी वाढवली.



मध्यतरानंतर ४० व्या मिनिटाला बदली खेळाडू विद्याधर धबालेने गोल करून गोलफरक ३-० भक्कम केला. सामन्याच्या ५३ व्या मिनिटाला भिमनगरच्या अक्षय होडगेने बचावफळीतील गोंधळाचा फायदा उठवत गोल करून पिछाडी ३-१ अशी कमी केली. ज्यादा वेळेत युनायटेडच्या अवधूत चव्हाणने गोल मारत ४-१ असा मोठा विजय साकारला. सॉकर ट्रेनिंग सेंटरने गत उपविजेत्या केबीआरला एका गोलने नमवून धक्कादायक पराभव केला. मध्यरानंतर सॉकरच्या आदेश जाधवने मारलेला गोल निर्णायक ठरला. शेवटच्या मिनिटाला केबीआऱच्या विशाल भोईटेने गोलरक्षक गोलात नसताना मिळालेली बरोबरीची सुवर्णसंधी दवडली. दरम्यान, केएसएचे संभाजी मांगोरे- पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन झाले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, स्पर्धा प्रमुख दीपक घोडके, आणाप्पा गाडवी, एम. एस. बोजगर, किरण कावणेकर उपस्थित होते. 


उद्याचे सामने


गडहिंग्लज युनायटेड 'अ' विरुध्द सॉकर ट्रेनिंग सेंटर दु. २.०० वा.

संयुक्त भिमनगर वि. गडहिंग्लज युनायटेड 'ब'. दु. ३.३० वा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.