आजरा : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा यांच्या वतीने उद्या मंगळवार दि. 18 मार्च रोजी जागतीक ग्राहक दिन कार्यक्रम तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यलय आजरा येथील पहिला मजला मिटींग हॉलमध्ये आयोजित केला आहे.
आजरा तालुक्यातील सर्वच ग्राहकांनी आपले हक्क अधिकार समजून घेणेसाठी व आपले कांही मुद्दे किंवा आपली फसवणूक झाली असेल किंवा आपले काम कोणी टाळाटाळ करत असतील त्याबाबत सुचना, मार्गदर्शन मिळणार आहे.
दुकानदार / रेशन/पंचायतसमिती / तहसील कार्यालय / एस टी महामंडळ / आरोग्य / कृषी विभाग / उपअभियंता बांधकाम / सहाय्यक निबंधक / भुमी अभिलेख [मोजणीखाते ] / इंडीयन / HP गॅस आणि इतर सर्व विभागातील कांही मुद्दे असतील ते घेऊन ठीक 11वा. उपस्थित राहून मांडावेत. असे आवाहन ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

