Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना प्रशालेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक मुलगी अपत्य माता पालकांचा सत्कार



गडहिंग्लज (प्रतिनिधी ) : येथील साधना प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात  साजरा करण्यात आला. यावेळी एक मुलगी अपत्य असलेल्या मातांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कोतूमाय यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.



स्वागत व प्रास्ताविक सौ. कविता कोळेकर यांनी केले. या कार्यक्रमा दरम्यान एक मुलगी अपत्य असणाऱ्या माता पालक अनिता देवडकर, क्रांती केसरकर, गीता निकम, कविता सन्वके यांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला.



संस्थेच्या संचालिका फिलॉन बारदेस्कर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व महिलांचे समाजातील स्थान स्पष्ट केले. पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांनी कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून दिला. प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी महिला दिन साजरा करण्याचा हेतू स्पष्ट करून नारीशक्तीचा सन्मान केला. स्मिता पाटोळे हिने स्त्रियांचे योगदान या विषयावर  मनोगत व्यक्त केले.



कार्यक्रमाचे नियोजन मनीषा पाटोळे, अफसाना यळकूद्रे, शितल भवारी, शितल हरळीकर, सारिका देसाई, अनुसया कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बर्था फर्नांडिस, निलोफर शेख, अश्विनी पाटील यांनी केले. आभार सुनिता नाईक यांनी मानले. कार्यक्रमास कॉमर्स विभागाच्या प्रभारी प्राचार्या वैशाली भिऊंगडे, सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.