Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड-हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दिनांक 26 रोजी मोफत भव्य रोजगार मेळावा

गोव्यातील अनन्या मॅन पॉवर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आयोजन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गोवा येथील अनन्या मॅन पॉवर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने हलकर्णी (तालुका चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील मुलांसाठी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती रिक्रुटमेंट एक्झिक्यूटिव्ह संदेश गुरव यांनी दिली.



या रोजगार मेळाव्यात गोव्यातील वेर्णा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील दूरसंचार कंपन्यांमध्ये विविध तीनशे रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय कोणतेही ट्रेड, डिप्लोमा, बीई, बीएससी, बीकॉम, बीए यासह कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या रोजगार मेळाव्यात भाग घेऊ शकतात. या रोजगार मेळाव्यात भाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आधार कार्ड झेरॉक्स, बायोडेटा, शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रक झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो एक अशी कागदपत्रे आणावीत. अधिक माहितीसाठी संदेश गुरव 7517020620, 9922934502 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.