Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव केंद्र शाळेतील आरोग्य शिबिरात 300 मुलांची तपासणी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): पी.एम .श्री केंद्रशाळा भडगाव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. पाच दिवस हे शिबिर पार पडले. यामध्ये एकूण 300 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.



सदर शिबिर एसजीएमच्या सौ रूपाली कोरी, सौ.संगीता मनगुळे व यांच्या टिम यांच्या टीमच्या सहकार्याने घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात   एकूण ३००   मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कान, नाक, घसा, जनरल तपासणी, रक्तगट व इतर सर्व तपासण्या करून त्यावर औषधोपचार करण्यात आले. यावेळी  मुख्याध्यापक बाळासो शेरेकर, केंद्रप्रमुख महारूद्र हुक्केरी, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.