Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज भाजपा मंडल अध्यक्षपदी प्रितम कापसे यांची फेरनिवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): भाजपाचे गडहिंग्लज -कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मंडल अध्यक्ष म्हणून प्रीतम कापसे यांची फेरनिवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून भाजपा कोल्हापूर जिल्हा चिटणीस तानाजी कुरणे यांचे मार्गदर्शन लाभले.




निवडीच्या वेळी निवडणूक अर्जावर सूचक म्हणून भाजपा विस्तारक संदीप नाथबुवा आणि अनुमोदक म्हणून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्या सह्या झाल्या. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा प्रा.अनिता चौगुले, अमित देशपांडे, अनिल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्षा सौ. अर्चना रिंगणे, गडहिंग्लज शहर महिला सरचिटणीस सौ. भारती चंद्रकांत सावंत, शहर अध्यक्षा सौ. नीलांबरी भुइंबर, संदीप कुरळे, महिला शहर सरचिटणीस सौ अनिता गुरव, राजू मिरजे, सौ. मनीषा कुरळे, दिपा कुलकर्णी, आनंदी चव्हाण, विश्वनाथ खोत उपस्थित होते.



निवडीनंतर बोलताना श्री. कापसे यांनी महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष विस्ताराचे काम समाजातील शेवटच्या घटकाचे उत्थानासाठी राबवणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.