लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोहोचवले पाहिजे यासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे, पुणे यांचे "आपले भविष्य भारतीय संविधान" हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला व शिक्षकांना भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त गडहिंग्लज येथील लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
गडहिंग्लज शहरातील डॉ. झाकिर हुसैन उर्दू विद्यालय, काळू मास्तर विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, बँरिस्टर नाथ पै विद्यालय, दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळांना संविधानाची प्रत्येकी पाच प्रति देवून आंबेडकर जंयती साजरी करण्यात आली.
लकी खिदमत फाउंडेशन अध्यक्ष अमजत मिरा, इम्रान चाँद, इकबाल नंनदीकर, समीर राऊत, इरफान मुजावर, संविधान संविधान चळवळीचे संग्राम सावंत, संतोष कांबळे, दिंगबर विटेकरी, प्रकाश कांबळे, जमीर नदाफ, इरफान शेख, यासीन शेख, अफताब नदाफ , शिलेदार, मलिकजान नदाफ, तौहिद हेब्बाळे, अमजद नदाफ, तबारक अन्सारी व सर्व शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.




