गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त 'आम्ही गडहिंग्लजकर', राष्ट्रसेवादल व सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रांत कार्यालय आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन जनता दलाचे तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारे गीत एकत्र गात अभिवादन केले.
यावेळी बाळेश नाईक, रमजान अत्तार, डॉ. बेळगुद्री, युवराज बरगे, उदय कदम, गौतम कांबळे, बसवराज आजरी, प्रकाश भोईटे, प्रा. ज्ञानराजा चिघळीकर, साताप्पा कांबळे, प्रकाश कांबळे, पुनम म्हेत्री, अरुणा शिंदे, उज्वला दळवी, परशुराम कांबळे, गणपतराव पाटोळे, कुमार पाटील, शिवाजी भोसले, मनोहर दावणे, सुरेश चव्हाण यांच्यासह आम्ही गडहिंग्लजकर, राष्ट्रसेवा दल, सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.


