Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्हा शिव उद्योग संघटना नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

हसुरचंपू शाखा कार्यालयात कार्यक्रम संपन्न 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख दीपक काळिंदे,चिटणीस प्रकाश ओवाळे यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजाभाऊ भिलारे, जिल्हाप्रमुख मारुती कमते यांच्याकडून  सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्रे देण्यात आली. हसुरचंपू शाखा कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. 




नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्य महिला प्रमुख गीता जेदे, उपजिल्हाप्रमुख जयकुमार देसाई, कोल्हापुर जिल्हा संघटक महेश लाखे, महिला जिल्हाप्रमुख इंद्रायणी बोकमुरकर, जिल्हा सचिव मदन पाटील, भोजन समिती प्रमुख नीलम धर्माधिकारी, कोल्हापूर जिल्हा मीडिया समिती प्रमुख विनायक जितकर, कोल्हापूर जिल्हा कृषी विभाग प्रमुख विश्वास पाटील, जिल्हा आरोग्य समिती प्रमुख कृष्णा जोतिबा बामणे, शिक्षण समिती प्रमुख  अस्मिता देसाई, बँकिंग अँड फायनान्सिंग प्रमुख सयाजी मारुती पाटील, आरोग्य समिती उपप्रमुख सावित्री तानाजी कल्याणकर, रोजगार समिती प्रमुख अरुण शिंदे, महिला रोजगार समिती प्रमुख सुजाता कुंभार यांचा समावेश आहे.



आजरा तालुका प्रमुख राजश्री सुतार, सौरभ तोडकर, संभाजी पाटील, रेश्मा पाटील, भारत मोरे, विनोद नाईक, दगडू  कतिवले, पूजा भेंडवडकर, संगीता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राजाभाऊ भिलारे यांनी उद्योजक निर्मिती व लोकांना रोजगार निर्मिती करिता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसेना शाखाप्रमुख चंद्रशेखर खवणे यांनी गुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. मारुती कमते यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.