Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगडचा युवक बनला रोजगारनिर्माता ; शेकडो बेरोजगारांना मिळवून दिला रोजगार



चंदगड : चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावचा संदेश सुधाकर गुरव या तरुणाने आपल्या मेहनतीने आणि दृढ इच्छाशक्तीने समाजात मोठे योगदान दिले आहे. 'अनन्या मॅनपॉवर' कंपनीचे रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून गोव्यात कार्यरत असलेल्या गुरव यांनी आजवर 700 हून अधिक युवकांना रोजगार मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.




नुकत्याच चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथे पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात, संदेश गुरव यांच्या सहकार्याने गोवा येथील विविध क्षेत्रांत काम करण्यासाठी 55 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या वेळी संदेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना सांगितले, "नोकरी करणारे नाही, तर नोकरी देणारे बना." त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे चंदगड तालुक्यातील तरुणाईला नवी दिशा मिळाली असून रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.