नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी, कराड, सांगली, मिरज येथील स्पर्धकांचा सहभाग
जय जवान जय किसान फौंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लज यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मुला मुलींसाठी आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटात या स्पर्धा पार पडल्या.
१२ वर्षांखालील मुली : प्रांजली आजरेकर, स्वेच्छा कदम (मनमाड) आराध्या नाईक (नाशिक). मुले : संकेत मोरे (राजगोळी), सोहम आजरेकर (संकेश्वर), पवन संकपाळ (कराड).१२ ते १८ वयोगट (मुली) ३ कि.मी- ऋतुजा जडे (दुंडगे), जान्हवी मोहनगेकर (किणी), सृष्टी मोर्ती (हरळी बुद्रूक). मुले (३ किमी)- ऋतिक वर्मा (गडहिंग्लज), सोहन हसुरे (हसूरचंपू), शुभम खोत (मिरज). १८ वर्षे वरील (खुला गट-मुली) ४ कि.मी- ममता पाटील (मुंगुरवाडी), स्नेहल खरात (कोल्हापूर), गायत्री पाटील (लिंगनूर क.नूल). मुले ५ कि.मी- अनिकेत शिंगारे (सांगली), राहुल लव्हटे (इचलकरंजी), अभिजीत हजारे (कराड).
यावेळी विजेत्या स्पर्धकांना वीरपत्नी सुवर्णा कंकणवाडी यांच्याकडून शहीद नायब सुभेदार दुरदूंडी कंकणवाडी यांच्या स्मरणार्थ चषक तर वीरपत्नी राधाबाई तेलवेकर व वीरपत्नी मंगल कदम यांच्याकडून स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देण्यात आले. बेलबाग येथील जडेयसिद्धेश्वर आश्रम येथील महंत सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जय जवान जय किसान फौंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




