Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मनसेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांचा सत्कार

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाने मोठ्या शस्त्रक्रिया गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मान 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाने मोठ्या शस्त्रक्रिया गटात राज्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळवल्याबद्दल नुकतेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे गौरव करण्यात आला. याबद्दल मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे व टीमचे अभिनंदन केले.



यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, हे उपजिल्हा रुग्णालय सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत आहे. डॉ. चंद्रकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर विविध खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करून रुग्णांना जीवदान देण्याचे केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. याची दखल शासन स्तरावरून देखील घेत केलेला गौरव हा गडहिंग्लजचा नावलौकिक वाढविणार आहे. 



कोरोना काळात तर तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. आंबोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज तालुक्यातील जनतेला जीवदान देण्याचे काम या उपजिल्हा रुग्णालयाने केले आहे. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. या रुग्णालयातील कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मनसे सदैव पाठीशी असेल अशी ग्वाही त्यांनी देत डॉ. चंद्रकांत खोत यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. यावेळी युवराज बरगे, श्री. कातकर, स्वप्निल गुरव यांच्यासह इतर मान्यवर व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.