Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात पाऊस ; उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा



आजरा (हसन तकीलदार): वाढत्या उष्म्याने दिवसभर  होणारी अंगाची लाही लाही, घामाच्या धारा यामुळे आजऱ्यातील नागरिक हैराण झाले होते. परंतु दुपारी नभ दाटून आले. मेघ गर्जना करू लागले आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या. आज दुपारी वरुण राजाने कृपादृष्टी केली. दुपारी चारच्या सुमारास वाळवाच्या चांगल्या सरी कोसळल्या.



रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ झाली. परंतु बळीराजा आणि लोक सुखावले. दिवसभराच्या उष्म्यापासून सुटका मिळाली. हवेत गारवा निर्माण झाला. ऊस पिकासाठी हा पाऊस वरदान आहे. गटारी तुडुंब झाल्या, नळपाणी योजनेचे काम सुरु असल्याने सर्वत्र रस्त्याची खुदाई झाली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाले आहे याचा त्रास दुचाकीस्वारांना आणि पदचाऱ्यांना होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.