Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीत श्री बसवेश्वर मंदिर उदघाटन समारंभ, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण निमित्त गावात भक्तीमय वातावरण

दिनांक ३० एप्रिलपर्यंत चालणार विविध कार्यक्रम


दररोज मंदिरात विविध मठाच्या स्वामीजींचे प्रवचन व महाप्रसाद





गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज)येथील श्री बसवेश्वर मंदिर उदघाटन समारंभ, श्री बसवाण्णा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण निमित्त दिनांक २६ एप्रिल पासून गावात विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. नूल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, कारिमठ हत्तरगी येथील मठाचे मठाधिपती सिद्धेश्वर महास्वामीजी, गडहिंग्लज बेलबाग येथील महासिद्धेश्वर स्वामीजी, हिटणी मठाचे प्रभुलिंग स्वामीजी, गोकाक येथील बसय्या हिरेमठ यांच्या दिव्य सानिध्याखाली विविध कार्यक्रम पार पडत आहेत. लिंगायत समाजासह गावातील सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. 




शनिवार दिनांक २६ रोजी सुवासिनींची कुंभ कलशासह शिवाचार्य महास्वामीजींची पदयात्रा पार पडली. सायंकाळी प्रवचन व महाप्रसाद आयोजित केले होते. रविवार दिनांक २७ रोजी स्वामीजींची पदयात्रा, प्रवचन व महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. आज सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी लिंग दीक्षा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गावातून श्री बसवेश्वर मूर्ती व कळसाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उद्या मंगळवार दिनांक २९ रोजी सकाळी आठ वाजता वास्तुशांती व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसाद  व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत प्रवचन व महाप्रसाद तर बुधवार दिनांक ३० रोजी सकाळी आठ वाजता कळसारोहण कार्यक्रम, सकाळी नऊ वाजता श्री बसवेश्वर जयंती उत्सव कार्यक्रम. त्यानंतर पालखीसह बैलजोडीची मिरवणूक व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमांचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बसवेश्वर मंदिर कमिटी व समस्त लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.