गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काढलेली सुबक रांगोळी, विद्यार्थ्यांसाठी सजवलेले आकर्षक फलक, नवागतांच्या स्वागतासाठी केलेला फुलांचा कमानी, शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी गणवेश, पाठपुस्तके, वही, बॅग वाटप अध्यक्ष विजुभाई शहा, उद्योजक, सुमित सगांज, पत्रकार अमानुला मालदार व पालकांच्या हस्ते शालेय शैक्षणिक साहित्य देऊन पुष्पगुच्छ, नवगतांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विजुभाई शहा यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला पेढे वाटप करण्यात आले. श्री. शहा यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, कोणतीही अडचण असेल तर न घाबरता आपल्या शिक्षकांना सांगावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी प्राचार्य आर.एस.पाटील, परिवेक्षक के. बी. पाटील, शिक्षक, शिक्षक कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक आर. एस. मठपती, श्री. निर्वाणी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. पाचवीच्या मुलांना स्कूल बॅग शिक्षक आर. एस. मठपती यांनी स्वखर्चाने दिले.





