Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. श्रुती पोतदार यांच्या “आईचे आईपण, बाळाचे संगोपन” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील पोतदार नेचर क्युअर व गंधर्वा मुझिक-चेस अकॅडमीच्या संचालिका  डॉ. श्रुती योगेश पोतदार यांच्या “आईचे आईपण, बाळाचे संगोपन” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तासगाव येथे नुकताच पार पडला.



यावेळी सौ. वर्षा वाशीकर - मुख्याध्यापिका, डॉ. बिंदुसार पलंगे (एम डी मेडीसीन), बालरोगतज्ञ डॉ. दानेश पोतदार, रेडीओलोजीस्ट डॉ. दिपाली डोंबे, गायनेकोलोजीस्ट डॉ.राहुल आर्वे, स्कीन स्पेशालीस्ट डॉ. स्नेहल गुरव, ऑर्थोडोन्टिक सर्जन डॉ.सुरज पोतदार, योग व निसर्गोपचार तज्ञ डॉ. योगेश पोतदार, डॉ. स्वाती पाटील, डॉ. माने पाटील, डॉ.जयश्री शिवणकर, मोहन मोहिते,  विशाल मोरे यांची उपस्थिती होती.



सावंतवाडीचे प्रसिद्ध लेखक व कवी भाऊसाहेब गोसावी, सौ. संगीता सुरेश पोतदार, सौ. मधुमती प्रसाद पोतदार यांच्यासह इतर भागातील महिलांनी डॉ. श्रुती पोतदार यांना या समाज प्रबोधन कार्यास व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.



       

गर्भावस्थेतील आई व बाळाच्या समस्या व त्यावर उपाय यावर आधारित हे पुस्तक आहे. आज सर्व सोयीसुविधांनी युक्त दवाखाने जरी उपलब्ध असले तरी स्त्रीला गरोदारपणापासून प्रसूतीपर्यंत व त्यानंतर बाळाचे संगोपन करत असताना शारीरिक, मानसिक, तसेच भावनिक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठीच नव माता व गर्भवती यांचा हा प्रवास आणखी सुखकारक व्हावा या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.  याचा लाभ गरोदर महिला, नवमाता, नव विवाहिता यांनी नक्की घ्यावा. हे पुस्तक पोतदार नेचर क्युअर क्लिनिक, डॉक्टर्स कॉलनी, गडहिंग्लज येथे उपलब्ध आहे. असे आवाहन डॉ. श्रुती पोतदार यांनी केले आहे. संपर्कासाठी  -7558373387/8277720584.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.