गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना परिवाराचे माजी प्राचार्य, लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलचे माजी अध्यक्ष व विद्यमान झोन चेअरमन रफिक निजामोद्दीन पटेल यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळावर सेवानिवृत मुख्याध्यापक सदस्यपदी निवड झाली आहे.
या निवडीसाठी जिल्ह्याचे शिक्षक नेते दादा लाड, संघाचे अध्यक्ष राहुल पवार व सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले. सदर निवडीसाठी सचिन शिंदे, सचिन रेडेकर, विनायक नाईक, संजय देसाई, संजय भांदुगरे, आर. के. शिंदे यांनी प्रयत्न केले. सदर निवडीमुळे रफिक पटेल यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

